पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. 17 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव, 9.30 वा. कुडाळ येथून मोटारीने ग्रामिण रुग्णालय, वेंगुर्लाकडे प्रयाण, 10.15 वा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना वेंगुर्ला तालुका व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामिण रुग्णालय, वेंगुर्ला येथे आयोजित मोफत महा आरोग्य तपासणी शिबीरास भेट, 10.45 वा. वेंगुर्ला शाळा नं. 1 येथे बॅरिस्टर नाथ पै यांच्या 50 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनावर अधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 12.15 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण, 1.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन, पाहणी व जिल्हाधिकारी, मुख्य अभियंता एम.आय.डी.सी., कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी. कार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी., विमानतळ विकासक प्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक, दुपारी 2.00 वा. चिपी विमानतळ येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. शिवसेना शाखा कुडाळ येथे युवासेनेच्या वडापाव सेंटर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे राखीव, सायं. 5.00 वा. सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनला सदिच्छा भेट. सायं. 5.30 वा. सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

You cannot copy content of this page