*⚡बांदा ता२७-:* आमदार दीपक केसरकर यांनी २५-१५ निधीतून बांदा -गवळीटेम्ब येथे गणपती विसर्जनासाठी मंजूर केलेल्या विसर्जन साना व घाट पायऱ्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक महादेव आईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. गेली कित्येक दिवस याठिकाणी पायऱ्या करण्याची मागणी होत होती. कामास प्रारंभ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. .
यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, बाळू सावंत स्वप्नाली पवार, संजय आईर, शुभम पांगम, निखिल मयेकर, माधुरी आईर, अक्षय वराडकर, आना सावंत, संजना शेटकर, सतीश शेटकर, अनिश वराडकर, पंकज देसाई, अभिजित देसाई आदी उपस्थित होते.
