शेर्ले-बांदा पुलाच्या भरावामुळे शेतीस धोका!

पावसाळ्यात परिसरात माती घुसणार : दखल न घेतल्यास भाजप आंदोलन छेडेल: संजू परब

बांदा ता.२७:जीवन प्राधिकरणकडून शेर्ले येथे उभारण्यात आलेल्या शेर्ले-बांदा या पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे पावसाळ्यात परिसरात मातीचा भराव खचून शेत जमीन खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत त्याठिकाणी धाव घेतली.

याबाबत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा भाजपाच्या माध्यमातून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरण कडुन पाईप लाईन टाकण्यासाठी पूल बांधण्यात आले आहे. मात्र पुलाची उंची मोठी आहे. भर पावसात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसराततील शेत जमीन खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी दिल्या होत्या. त्यानंतर श्री. परब यांनी आज त्या ठिकाणी भेट दिली.

You cannot copy content of this page