सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निवृत्त पोलिस निरीक्षक शंकरराव पाटील (६३, सध्या रा. पन्हाळा कोल्हापूर ) यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले. आपल्या ॲक्टिवा दुचाकीने जात असताना बोलेरो गाडीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. शंकरराव पाटील हे ३१ मे २०१७ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते आपल्या गावी राहत होते. सध्या ते एल एल बी चे शिक्षण घेत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
निवृत्त पोलिस निरीक्षक शंकरराव पाटील यांचे अपघाती दुःखद निधन…
