माजी पालकमंत्री दीपक केसरकर : पात्रता नसलेले मातोश्री विरोधात बोलल्याने आता आरेला कारे होणार!
सावंतवाडी ता.२७-: :* आजकाल कोणीही उठून मातोश्री विरोधात बोलत आहेत. अशा माणसांना बोलण्यासाठी उभं केलं जातं. बाळासाहेब असताना अशा माणसांनी हिम्मत केली नव्हती मात्र तीच माणसे बोलताना दिसतात. दिल्लीच तख्त नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष करत आलय. त्यामुळे शिवसैनिकानी आता आरेला कारे केलं पाहिजे. आम्ही केलेल्या कामांचं श्रेय आज विरोधक घेत आहेत त्यांना शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारलं पाहिजे असं आवाहनही माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसंपर्क अभियान प्रसंगी केलं.
