ब्लास्टिंगचा स्फोट झाला तर वाडीसमूळ नष्ट होईल

आमचे स्थलांतर करा ;कळसुली ग्रामस्थ झाले आक्रमक

कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील कळसुली गावात मोठ्या प्रमाणात क्रशर व्यवसाय चालतो आणि या क्रशर व्यवसायामुळे क्रशर मालक कधीही ब्लास्टिंग करून मोठा स्फोट करतात आणि याचा त्रास गावातील घरांना होत आहे.गावातील घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच कानाला त्रास होत आहे.परिणामी गावातील लोकांच्या जीवितास धोका असल्याने आमचे स्थलांतर करा अशी मागणी काही गावकऱ्यांनी कणकवली तहसीलदार यांना निवेदन देताना केली आहे.

यावेळी नामदेव घाडीगावकर ,सुभाष घाडगांवकर, तुकाराम घाडीगावकर,जयवंत घाडीगांवकर, निलेश गांवकर,रामचंद्र सावंत ,संजय नेरुरकर,शशिकांत घाडी,अरुण घाडीगांवकर,उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळसुली गावातील होणारे दगड खाणीवर लावण्यात येणारे सुरुंग व बास्टींगचा आवाजामुळे आमच्या घरांना तड्डे गेले आहेत. व आमचे नुकसान झालेले आहे त्याबाबत आपणास वारंवार विनंती अगर निवेदन देवून सुध्दा आपण दखल घेतलेली नाही. २६/५/२०२२ रोजी रात्रौ ८.१५ च्या सुमारास सुरुंग लावला असून त्याचा आवाज मोठा येवून आम्हांला खूपच त्रास झालेला आहे.

तसेच कानाना त्रास होवून ऐकायला येत नाही. जर आपण वेळीच बंद केला नसल्यास मा. जिल्हाधिकारी अगर तत्सम कार्यालयात निवेदन देणे भाग पडेल तरी वेळीच आपण दखल घ्यावी व आमचा त्रास दूर करावा ही विनंती आहे. तरी शासनाचे परिपत्रकाप्रमाणे नव्याने गौण खनिज, काळा दगड उत्खनानास बंदी आहे. तरी याबाबत शासनाचे परिपत्रक पाहून लोकहिताचा विचार करुन तसेच क्रशर बंद न झाल्यास होणा-या त्रासापासून स्थलांतर करण्यात यावे अशी मागील आता कळसुली ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे

You cannot copy content of this page