टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल…

अमित सामंत; पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्थांच्या समस्या सोडवा…

*⚡कुडाळ ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन पुकारेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज दिला असून, पहिल्यांदा स्थानिक प्रकल्पग्रस्ताच्या समस्या सोडवा त्यांना न्याय मिळवून द्या आणि त्यानंतरच टोल वसुली सुरू करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी जनतेने विविध आंदोलन केली आहेत. परंतु, अद्याप त्या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. मात्र या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून टोल एजन्सी टोल वसुलीचा घाट घालत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

You cannot copy content of this page