तर गावा गावात वैभव नाईक आणि त्यांच्या कंपनीवर गुन्ह्यांचा कलम ४२० चा नावाचा पर्वत तयार आहे-:धोंडी चिंदरकर…

मालवण ता.२६-:* प्रत्येक ठिकाणी दिलेली खोटी आश्वासने आणि वाटलेली पत्रे एकत्र केली तर लोकांची फसवणूक केली म्हणून आम वैभव नाईक यांच्या विरोधात कलम ४२० चा पर्वत तयार होईल असा सणसणीत टोला भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावत आम वैभव नाईक यांनी देवबाग बंधाऱ्याच्या प्रश्नावरून राजकारण करू नये असेही पत्रकात म्हटले आहे सागरी अतिक्रमण ग्रस्त देवबाग गावच्या बंधाऱ्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू असून आज सोशल मीडियावर आमदार वैभव नाईक यांची भाजप नेते निलेश राणे यांच्याबाबत प्रतिक्रिया प्रसारित झाल्यानंतर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रक काढून आम. नाईक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पत्रकात श्री चिंदरकर यांनी म्हटले आहे की, एखाद्या खासदार आमदारांनी जर आपला निधी दिला आणि प्रशासकीय मंजुरी झाली तर वर्क ऑर्डर कोण देणार? आणि जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे राजकारण कसलं करता? असा सवाल चिंदरकर यांनी उपस्थित करून आम नाईकांचे एवढं खालच्या थराच राजकारण जे सुरू आहे ते कशाचं ध्योतक आहे? वैभव नाईक यांनी क्रोसेक्शन सर्वेचे पैसे हे आम्ही सांगितल्यानतर भरले मग ते सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय तळाशील आणि देवबागचे केंद्र स्थरावरील मंजुरीचे काय होणार ते पण जनतेला सांगा ? का उगाच लोकांची दिशाभूल करून जनतेच्या जीवाशी खेळत आहात?आमदार नाईक यांनी जनतेच्या जीवाशी खेळणे थांबवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेऊन विकासाच्या मुद्यावर चर्चा करावी असेही श्री चिंदरकर यांनी म्हटले आहे

You cannot copy content of this page