तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
बांदा ता.२६-:* कास येथील श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन सोहळा २७ ते २९ मे दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार २७ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व तीर्थप्रसाद, ११ वा. लघुरुद्र, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ६ वा. स्थानिकांचे भजन व रात्री ९ वा. गाव मर्यादित सीने नृत्य स्पर्धा होणार आहे. शनिवार २८ रोजी ७ वा. अभिषेक व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा. भजन, रात्री ९ वा. गजालींचो कोकण टीम प्रस्तुत १० स्टार दोडामार्ग यांचा कॉमेडी कार्यक्रम होईल.
रविवार २९ रोजी सकाळी ७ वा. अभिषेक व तीर्थप्रसाद, ११ वा. रांगोळी स्पर्धा, दुपारी १२ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. वास्को (गोवा) येथील भजन, रात्री १० वा. सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण, ११ वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कास ग्रामस्थ व गोवा फ्रेंड सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.
