पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपची नियोजन बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१६ बूथ स्थापन करण्याचा निर्धार

कुडाळ ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा भाजपची कुडाळ येथे नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा संयोजक बंड्या सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळ एमआयडीसी येथे पार पडली.

या बैठकीस विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून आगामी निवडणुकीत भाजपचे 916 बूथ स्थापन करण्याचा निर्धार देखील करण्यात आला. यावेळी दादा साहिल, बबली वायंगणकर, रूपेश कनडे, बालासाहेब हरियान, मनोज रावराणें कणकवली सभापति, सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page