कणकवली ओसरगाव टोल टोलनाक्यावर जिल्हावासीयांना सूट द्यावी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : उद्यापासून सुरू होणार टोलवसुली

कणकवली ता.२६-:* राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ओसरगाव इथं टोल नाका सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असून यातून जिल्हावासीयांना सूट देण्यात यावी अस आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केल आहे. जिल्हावासियांना सुट न मिळाल्यास भाजपचा हिसका दाखवू असा इशारा तेली यांनी दिला. ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे.

याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयाचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे.

You cannot copy content of this page