युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे ५ जूनला कनेडी येथे “आंबे खाणे” स्पर्धा

संदेश सावंत,संजना सावंत यांच्या संकल्पनेतुन आयोजन

कणकवली ता.२४-:* युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्या वतीने रविवार ५ जून २०२२ रोजी सकाळी १० वा कनेडी बाजारपेठ सांगवे येथे आंबे खाणे या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फळांचा राजा आंब्याची चव मुलांना चाखता यावी व आंबा खाण्याचा आनंद मुलांनी लुटावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ गटात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकांना ३ मिनीटे वेळ देण्यात येणार असून जास्तीत जास्त आंबे खाणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात येईल.

१५ वर्षा खालील गट प्रथम क्रमांक २५००, द्वितीय क्रमांक १५००, तृतीय क्रमांक १००० रक्कमेचे शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. ७ वर्षा खालील गट – प्रथम क्रमांक १५००, द्वितीय क्रमांक १०००, तृतीय क्रमांक ७०० रक्कमेचे शैक्षणिक साहित्य बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. ही स्पर्धा नाटळ व हरकुळ जि प मतदार संघ मर्यादित आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून दिनांक 1 जून २०२२ पर्यंत नावनोंदणी करणार्‍या स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी प्रफुल्ल काणेकर (9422555059) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page