Headlines

गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने गडहिंग्लज येथे २६ मे. रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन…

गडहिंग्लज ता.२४-:* गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने गडहिंग्लज तालुक्यातील तरुणांसाठी गुरुवार दिनांक २६ मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे.

गोव्यातील नामांकित कंपन्यात गडहिंग्लज परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवी धारक मुले यांनी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री ओम साई मोटार ड्रायव्हिंग स्कूल, नवीन कोर्टा समोर, कडगाव रोड गडहिंग्लज येथे उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा घेऊन येणे आवश्यक आहे. याठिकाणी कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन मुलाखतीतून उमेदवारची निवड करणार आहेत. अधिक माहितीसाठी कृष्णा सावंत 8263866234, राहुल 8888430143, राजेश 7709151121, निलेश मोरजकर 9763717790, राहुल जाधव 9119419474 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page