साटेली भेडशी प्राथमिक आरोय केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करा

सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे बेमुदत उपोषण

*💫दोडामार्ग दि.१६.सुमित दळवी-:* साटेली भेडशी आरोग्यकेंद्रात तात्काळ तज्ञ वैदयकीयअधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी निवेदन दिल्याप्रमाणे आजपासून सामजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बेमुदत उपोषणास सुरवात केली असून जोपर्यंत तज्ञ वैदयकीय अधिकारी यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे यावेळी त्याच्यासोबत राजू धरणे रुपेश दळवी संतोष परमेकर सुरेश राठोड आदी सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page