एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल आणि कै. वासुदेव परब मित्रमंडळ यांच्या विद्यमाने करण्यात आले आयोजन…
सावंतवाडी ता.२४-:* एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल आणि कै. वासुदेव परब मित्रमंडळ आंबेगाव यांच्या विद्यमाने आंबेगाव येथे बुधवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या आरोग्य शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, जनरल सर्जरी, प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग, नेत्र तपासणी, अस्थिरोग इत्यादी आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात येणार आहेत.
तसेच इ सी जी, बी एस एल, नेत्र तपासणी, बोन डीसीज या आरोग्य तपासणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
