गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील युवक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई..

सावंतवाडी ता.२२-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी आरोसबाग येथे केलेल्या कारवाईत सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून गोवा बनावटीचे विद्येशी मद्य आणि बियर चे एकूण ४२ बॉक्स एकूण किंमत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीची दारू आणि मद्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी किंमत ३ लाख ५० हजार असे एकूण ५ लाख ६५ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक टी.बी.पाटील करत आहेत.

You cannot copy content of this page