रक्ताच्या स्पॉट टेस्टबाबत योग्य ते निर्देश द्या…

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची मागणी…

*⚡सावंतवाडी ता.२१-:* रक्ताची तातडीने आवश्यकता असताना रक्तपेढीमध्ये एलायजा टेस्ट बंधनकारक केल्यान रक्तदाते असून देखील रुग्णाला रक्त मिळण कठीण झाल आहे. अत्यंत तातडीच्यावेळी आॅपरेशन दरम्यान रक्त न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. त्यात ‘एलायजा’ टेस्टसाठी तांत्रिकबाबी तसेच दुर्मिळ रक्तगटाचे दाते उपलब्ध करण शक्य होत नाही. तेवढा साठा देखील रक्तपेढीत उपलब्ध नसतो, त्यामुळे अशावेळी आपल्या माध्यमातून सबंधित विभागाला स्पॉट टेस्टबाबत योग्य ते निर्देश देण्यात यावेत अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, प्रथमेश प्रभू यांनी केलीय. 

याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी, हि बाब रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने योग्य तो निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.

You cannot copy content of this page