मालवण ता.२०-:* क्यार वादळातील नुकसानग्रस्त १९४ रापण मच्छीमार बांधव शासनाच्या आर्थिक पॅकेजच्या लाभापासून वंचित राहिल्याबद्दल कोचरेकर रापण संघामार्फत कमलेश कोचरेकर यांनी भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यावर राणे यांनी मत्स्य आयुक्तांशी चर्चा केली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या पॅकेजचा लाभ वंचित मच्छीमारांना मिळेल असे या चर्चेत मत्स्य आयुक्तांकडून सांगण्यात आले.
क्यार वादळातील नुकसानग्रस्त १९४ रापण मच्छीमार बांधव आर्थिक पॅकेजमधून वंचित राहिले आहेत. या मच्छीमार बांधवांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे कोचरेकर रापण संघामार्फत कमलेश कोचरेकर यांनी लक्ष वेधले होते. निलेश राणे यांनी मत्स्य आयुक्तांची चर्चा केली असता आर्थिक पॅकेज साठी विशेष कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे असे सांगण्यात आले.
तसेच यासंदर्भातील पाठपुरावा आपण करत असून येत्या कॅबिनेटमध्ये त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे असे आयुक्तांकडून सांगण्यात आले. मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली असून सर्व मच्छिमारांना या योजनेतून लवकरात आर्थिक मदत मिळण्यासाठी मत्स्य मंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन मदत न मिळालेल्या मच्छीमार बांधवांच्या अडचणी समोर मांडणार आहेत, अशी माहिती कमलेश कोचरेकर यांनी दिली आहे.
