कबड्डी खेळाडू प्रेमींचा स्नेहमेळावा २३ रोजी

सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल येथे आयोजन

बांदा/ प्रतिनिधी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळातील आजी, माजी खेळाडू, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पंच, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, कबड्डी मार्गदर्शक, विविध क्रीडा संस्था, त्यांचे पदाधिकारी व कबड्डी प्रेमी यांच्या एकत्रित स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील कळसुळकर हायस्कुल येथे करण्यात आले आहे.

या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीची होत असलेली दुर्दशा, मागील १० वर्षाच्या वाटचालीची चर्चा, जिल्ह्यातील खेळाडूंना प्रॉब्लेम कबड्डीच्या धर्तीवर सिलेक्शन साठी येणारे अडथळे व आगामी दिशा ठरविणे, कबड्डी खेळाच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे याबाबत सविस्तर विवेचन करून दिशा ठरविण्यात येणार आहे. . जिल्ह्यातील कबड्डी प्रेमिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जितेंद्र म्हपसेकर, विकी केरकर, नंदन वेंगुर्लेकर, प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page