वाफोली मांजरडोंगरी देवस्थानचा २३ रोजी वाढदिवस

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बांदा /प्रतिनिधी . वाफोली येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मांजरडोंगरीकर देवस्थानचा वाढदिवस सोमवार दिनांक २३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. .

सकाळी सत्यनारायण महापूजा, अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व दुपारी 2 वाजल्यापासून तिर्थप्रसाद सुरु होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page