कणकवली शाळा नं .५ चे छप्पर दुरुस्तीचा प्रस्ताव का रखडला?

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांचा सवाल; अधिकाऱ्यांवर कारवाई करा

कणकवली ता.१९-:* कणकवली शहरातील शाळा नं . ५ चे छप्पर नादुरूस्त झालेले आहे . शाळेमध्ये ५३ मुले असून अशा छप्परामुळे त्यांच्या जिवीताला धोका उद्भवू शकतो. गेले तीन वर्षे प्रस्ताव पाठवूनही काम मंजूर का होत नाही ? असा सवाल करत या कार्यपद्धतीबाबत ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार करणार आहे . याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते , नगरसेवक अबिद नाईक यांनी केली .

आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण स्वत : छप्पराची डागडुजी करू , असे श्री . अबिद नाईक यांनी स्पष्ट केले कणकवली शाळा नं . ५ चे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत असल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते , नगरसेवक अबिद नाईक यांनी शाळेला भेट देत पाहणी केली . यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण , विस्तार अधिकारी सुर्यकांत वारंग , श्री . शिंदे , मुख्याध्यापिका कल्पना मलये , प्राथमिक शिक्षक समितीचे गिल्बर्ट फर्नांडीस , अमित केतकर , निशीकांत कडूलकर , विशाल ठाणेकर व इतर उपस्थित होते .

यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी प्रशासनाने प्राधन्यक्रमाने शाळेचे नाव पाठविलेले होते . आजच जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून कार्यवाही केली जाईल , असे सांगितले . मात्र , आठवडाभरात कार्यवाही न झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण स्वत : छप्पराची डागडुजी करू , असे अबिद नाईक यांनी स्पष्ट केले .

शाळेचे छप्पर गेल्या तीन वर्षांपासून धोकादायकस्थितीत आहे . प्रत्येक वेळी प्रस्ताव पाठविला . पण तो मंजूर का होत नाही . दरवळी तात्पुरती डागडुजी करतो . मात्र , यावर्षी छप्पराचा काही भागच कोसळला आहे . सर्वच रिप व कौले कोसळण्याच्या स्थितीत आहेत . यावर्षी इतर शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झाले . पण हा प्रस्ताव का मंजूर झाला नाही ? असा सवाल अबिद नाईक यांनी केला . यावेळी याहीवर्षी प्राधान्यक्रमात पहिल्यात तीन नंबरमध्येच या शाळेचे नाव होते . मात्र , मंजुरीच्या यादीत नाव नसल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले . तसेच आपण आजच याबाबत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत ही बाब निदर्शनास आणणार .

तसेच दुरुस्तीबाबतची कार्यवाही केली जाईल , असे सांगितले . मात्र , या शाळेमध्ये ५३ मुले असून उद्या अशा छप्परामुळे त्यांच्या जिवीताला धोका उद्भवू शकतो . पालकांनी मुले शाळेत न पाठविल्यास शाळा नं . ४ प्रमाणे याही शाळेची अवस्था होईल . प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत आपण ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून जबाबदार असलेल्यांवर कारवाईस भाग पाडले जाईल , असे अबिद नाईक यांनी सांगितले .

You cannot copy content of this page