शिवसेनेच्या पुढाऱ्याला हॉटेल बांधण्यासाठी ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार सहन करणार नाही…

माजी खासदार निलेश राणे; सर्जेकोट जेटी येथे सभा घेणार ..

मालवण ता.१८-:* सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याच्या कामात मच्छीमार ग्रामस्थांना होणारा त्रास दुर्लक्षित करून शिवसेनेच्या एका पुढाऱ्याच्या हॉटेलसाठी शिवसेना आमदार मनमानी पद्धतीने वागून काम करीत आहे सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याचे काम करताना मच्छीमार बोटी लँडिंग ठिकाणी दगड टाकून ठेवले. हा काय प्रकार आहे ? दमदाटी हुल्लडबाजी चालू देणार नाही येत्या २५ मे रोजी याविषयावर सर्जेकोट जेटी येथे सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, शिवसेना पुढाऱ्यांला हॉटेल बांधायला मच्छीमार व ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे प्रकार सहन कला जाणार नाहीत. सत्तेची मस्ती सुरू असेल तर ती जिरवणार. २५ मे दरम्यान सर्जेकोट जेटी येथे सभा घेणार. अशी माहिती भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांच्या, मच्छीमार यांच्या मागणीनुसार कामे झाली पाहिजेत. हीच आमची भूमिका आहे. मात्र कोणा एका साठी मनमानी पद्धतीने कामे होत असतील तर सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन यावर योग्य तो निर्णय घेऊन सडेतोड उत्तर दिले जाईल. मालवण कुडाळचं भलं हे काय करणार ? अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेना आमदार खासदार यांच्यावर केली.

मालवण कुडाळ मध्ये पर्यटन महोत्सव घेणार शासनाच्या पैशावर स्थानिक आमदाराने मालवणात पर्यटन महोत्सव घेतला. स्वतःच्या पैशाने हे महोत्सव घेऊ शकत नाहीत. जिल्ह्यात स्वतःच्या पैशाने महोत्सव घेणारे राणे साहेबच. त्याच धर्तीवर नोव्हेंबर डिसेंबर कालावधीत मालवण कुडाळ तालुक्यात भव्य दिव्य पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page