साताऱ्यातील पर्यटकांच्या कारला सावंतवाडी कोलगाव येथे अपघात…

तिघेजण जखमी; अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले..

सावंतवाडी ता.१६-:* गोव्यावरून सातार्‍याच्या दिशेने जात असताना सावंतवाडी कोलगाव येथे कारची झाडाला जोरदार धडक बसून अपघात झाला हा अपघात आज दुपारी 4 च्या सुमारास कोलगाव निरुखेवाडी येथे घडला.या अपघातात साताऱ्यातील एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कार चालक हा कुटुंबासमवेत गोव्यावरून सातार्‍याच्या दिशेने जात होता चालकासह पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोलगाव निरुखेवाडी येथे घडला घडला. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page