गव्याच्या पिलांना विहिरी बाहेर काढण्यात यश…

वनविभाग आणि ग्रामस्थांनी केले होते अथक प्रयत्न…

सावंतवाडी ता.१६-:माजगाव मेटवाडा परिसरात एका विहिरीत पडलेल्या गव्या रेड्याच्या दोन पिलांना विहिरी बाहेर काढण्यात यश आले आहे. विहिरीला कठडा नसल्याने ही दोन पिल्ले विहिरीत कोसळली होती. ही बाब लक्षात येताच वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम करून अखेर त्या दोन्ही पिलांना बाहेर काढले आहे.

You cannot copy content of this page