Headlines

नटीने अभिनय करावा, आमच्या नेत्यांवर टीका करून प्रसिध्दी मिळवू नये…

सावली पाटकर; अन्यथा महाप्रसाद देणार

सावंतवाडी ता.१५-:अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने तिचा सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येत आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष सावली पाटकर यांनी नटीने केवळ मनोरंजन करावे आमच्या नेत्यांवर टीका करून, प्रसिध्दी मिळवू नये, नाहीतर महाराष्ट्रातील युवती महाप्रसाद दिला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी सावंतवाडीत केतकी चितळे चा राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून जाहीर निषेध करण्यात आला असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

You cannot copy content of this page