जमीन मालक शिवराम पालव यांच्याहस्ते लोकार्पण
मालवण दि प्रतिनिधी बिळवस ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचे लोकार्पण सर्व जमीन मालकांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक रामचंद्र पालव यांच्या हस्ते फित कापून झाले. प्रथम नूतन ग्रामपंचायत कार्यालयात जमीन मालक शिवराम बापू पालव यांच्या हस्ते गणेश पूजन झाले. ही इमारत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत बांधण्यात आली आहे. यावेळी सूर्यकांत पालव म्हणाले, अतिशय चांगल्या पद्धतीने बिळवस ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत साकारली आहे.
या इमारतीच्या सुंदरतेप्रमाणेच येथील जनताभिमुख असा सुंदर कारभारही ग्रामपंचायतीने करावा आणि येथील जनतेची सेवा करावी. सरपंच पालव म्हणाल्या, ही नूतन वास्तू पूर्ण होण्यासाठी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सदस्य, प्रशासन अधिकारी वर्ग, सर्व सदस्य, ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानते. यापुढेही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्या सर्वांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल, असे सरपंच पालव म्हणाल्या. जमीन मालक जानकीबाई रामचंद्र पालव, भगवान शिवराम पालव, दिनेश लक्ष्मण पालव, शिवराम बापू पालव, सदानंद रामचंद्र पालव, अशोक रामचंद्र पालव, गोविंद रामचंद्र पालव, अनिल सदानंद पालव, दीपक भगवान पालव, आशिष अंकुश पालव, गोविंद सोमा सावंत, कृष्णाजी दत्ताराम पालव, चैतन्य रामचंद्र पालव उपस्थित होते. सर्व जमीन मालकांचा ग्रामपंचायतीतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच मानसी पालव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, रंजना पालव, प्रकाश फणसे, ग्रामसेवक युगलकिशोर प्रभूगावकर, दाजी पालव, अशोक पालव, सूर्यकांत पालव, गोपाळ पालव, सीताराम सावंत, शरद आंगणे, ग्रामविस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, कृषी अधिकारी संजय गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल फरांदे व नाईक उपस्थित होते.
