शहर अध्यक्ष प्रदीप कांबळे; ओबीसी बांधवांना जास्त जागेवर उमेदवारी देणार…
सावंतवाडी ता 12: आगामी होऊ घातलेल्या येथील नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढत देणार असून ओबीसींची राजकीय आरक्षण संपल्यामुळे ओबीसी बांधवांना जास्त जास्त उमेदवारी देऊ तसेच महिला आणि सुशिक्षित युवावर्गाला ही संधी दिली जाईल असे शहराध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी सांगितले ते रक्तदान शिबिराच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते
यावेळी तालुका अध्यक्ष विजय शेरलेकर ,जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव , कोकण प्रदेश सदस्य संजय जाधव,जिल्हा कार्यालयीन सचिव संदीप जाधव, तालुका महिला आघाडी प्रमुख मानसी सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष ताणू निकम,मालवण तालुका अध्यक्ष अक्षय कदम, कुडाळ तालुका युवक अध्यक्ष भिकाजी जाधव, माजी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, माजी सचिव मिलिंद नेमळेकर, मळगाव शाखा अध्यक्ष विकास जाधव, सामाजिक कार्यकर्ते आदेश जाधव, कृष्णा तुळसकर, प्रशांत पाटणकर,मुकेश कांबळे,हेमंत कांबळे,अनिकेत जाधव यशवंत देसाई, आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 ते 10 मे या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात आला यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर व सभासद मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे निरीक्षक संतोष खोपकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शहर महिला आघाडी प्रमुख उजमा शेख होत्या यावेळी जिल्हा निरीक्षक यांच्या उपस्थित पहिला येथील नगर परिषदेच्या महिला उमेदवार उजमा शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
