आणि बसमधील तो सेल्फी ठरला शेवटचा;

11 जणांच्या मृत्यूने मोदीही झाले भावुक!

*💫कर्नाटक दि.१५-:*  आज सकाळीच एक सुन्न करणारी बातमी समोर आली. नववर्षाच्यानिमित्ताने मित्रमैत्रिणींसोबत गोव्याला जाणाऱ्या 11 जणांवर काळाने घाला घातला. धारवाड राष्ट्रीय महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि  या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. याचे फोटो इतके भयंकर होते की ते वाचकांना दाखवूही शकत नाही. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला होता. काही तासांपूर्वी ही मित्रमंडळी आनंदाने गाणी गात-नाचत चालली होती. गेल्या वर्षभरापासून कहर माजवणारा कोरोना आणि कामाच्या व्यापातून काही काळ सुटका म्हणून या मित्रमैत्रिणींनी ही ट्रिप आयोजित केली असावी. मात्र दुर्देवाने त्यांना हा आनंदही घेता आला नाही. अपघातापूर्वीचा एक फोटो समोर आला आहे. मित्रमैत्रिणींसोबतचा एक सेल्फी बरंच काही बोलून जाते. प्रिती नावाच्या एका तरुणीने आपल्या स्टेटसवर हा फोटो ठेवला होता. यावर तिने लिहिलं होतं…गो..गोवा..विथ स्कूल बडीज…येत्या ट्रिपमध्ये सर्वांसोबत खूप धमाल..खूप फोटो आणि सेल्फी काढण्याची प्लानिंग सुरू असताना दुर्देवाने या ग्रुपचा हा शेवटचा सेल्फी ठरला आहे.

You cannot copy content of this page