*💫वेंगुर्ला दि.१५-:* श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे उदघाटन उद्या शनिवार १६ जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९. ३० वाजता भव्य बाईक रॅली आयोजित केली आहे. तरी युवाशक्तीने प्रचंड बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सन १५२८ पासून अविरत चालणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मंदिर पुनर्स्थापनेच्या संघर्षामध्ये आपण हिंदू समाजाने विजय मिळवला. यासाठी आपल्याला जवळजवळ ७६ प्रत्यक्ष युद्ध करावी लागली आहेत. आपल्या लाखो करोडो पूर्वजांनी या संघर्ष यज्ञवेदीमध्ये बलिदान दिले आहे. या सर्व संघर्षामध्ये त्या त्या वेळच्या तरुणांचे योगदान निर्णायक राहिले आहे. राम मंदिर निर्माणाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वाभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या या कार्यात आपण तरुणांचे विशेष व अधिक समर्पण असणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. यासाठी आपण सर्वजण मिळून राममंदिर निर्माण निधी समर्पण अभियान आपल्या जिल्ह्यात करीत आहोत. या अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे उदघाटन तसेच भव्य बाईक रॅलीसाठी युवाशक्तीने बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक आणि सहसंयोजक मंदार बागलकर यांनी केले आहे.
श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या तालुका कार्यालयाचे उद्या उदघाटन…
