आमरण उपोषण करणाऱ्या “त्या” कामगारांपैकी दोघांची तब्येत ढासळली

*उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल; थकित पगार मिळण्यासाठी सुरू आहे उपोषण*

सिंधुदुर्गनगरी ता १५ ११ महिन्याचा थकीत राहिलेला पगार मिळावा. यासाठी फोंडा घाट येथील चिराग माईंन्सच्या कामगारांचे गेले चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. यातील उपोषण करते संजय तेली आणि रामचंद्र धुरी या कामगारांची तब्येत अत्यंत खालावल्याने त्यांना आज तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथील चिराग माईन्स च्या कामगारांना मार्च पासून गेले ११ महिने पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तात्काळ पगार मिळावा. या मागणी साठी त्यांनी मंगळवार १२ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. या कंपनीतील सुमारे ६० कामगार ११ महिने पगारापासून वंचित आहेत. यामध्ये महाराष्ट्र माईन्स वर्कर युनियनचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र धुरी, विजय सावंत, संजय तेली ,संदीप कानडे, गुरुनाथ भोगले, शामसुंदर नानचे ,संदीप जाधव, सुनील नानचे, विठ्ठल लाड, अभिमन्यू लाड, रवींद्र सोलकर ,विनोद पाटील, रुपेश रेवडेकर ,माधुरी लाड, सायली तेली, सुचिता नानचे, आकांशा भालेकर, आदी कामगारांचा सहभाग आहे. .फोंडाघाट येथील चिराग माईन्स या कंपनीत हे कामगार कार्यरत असून .त्यांचे मार्च २०२० पासून चे वेतन मिळालेले नाही. कंपनी व्यवस्थापनाकडे याबाबत वारंवार मागणी करूनही उचित कार्यवाही झाली नाही. याबाबत ७ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे याबाबत सुनावणी झाली त्यावेळी ११ जानेवारी पूर्वी यावर चर्चा होऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. असे सांगितले मात्र आज पर्यंत वेतन मिळालेले नाही किंवा कसलीही चर्चा बैठक झालेली नाही . त्यामुळे त्यानी आपले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरु ठेवले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दरम्यान याची दखल घेत आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी कामगारांची भेट घेत आपण याबाबत संबंधित कंपनिशी चर्चा करुन आपला थकित पगार मिळऊन देण्याची हमी घेतली आहे.तरीही कामगारानी उपोषण सुरूच ठेवल्यामुळे उपोषण करणाऱ्या अनेक कामगारांची तब्बेत खालावली आहे.त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यातील संजय तेली व रामचंद्र धुरी या कामगारांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page