तालुक्यात सरासरी ७८.३१ टक्के मतदान
*💫कणकवली दि.१५-:* तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७८.३१ % मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तोंडवली – बावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायत साठी ७ मतदानकेंद्रांवर २ हजार १०७ मतदारांपैकी एकूण १ हजार ६५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भिरवंडे ग्रा.पं.च्या ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.उर्वरित ३ जागांसाठी ८८७ मतदारांपैकी एकूण ६६४ मतदारांनी मतदान केले. भिरवंडेत ७४.८६ % मतदान झाले. तर तोंडवली – बावशी ग्रामपंचायतिच्या ७ जागांसाठी १ हजार २२० पैकी ९८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तोंडवली – बावशी मध्ये ८०.८२ % मतदान झाले. गांधीनगर ग्रा पं. च्या ७ ही जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
