राजकारणा बरोबर सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी;वाढदिवसानिमित्त सांगेलकर यांच्यावर होत आहे शुभेच्छांचा वर्षाव
सावंतवाडी ता.१२-:* आपल्या सामाजिक कार्याने सावंतवाडीत वेगळ स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व म्हणजे कॉंग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर…. सावंतवाडी शहराच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच पुढे असणार नाव म्हणजे महेंद्र सांगेलकर. त्यांचा 12 मे रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या जीवनपटावर ग्लोबल महाराष्ट्र ने टाकलेला हा प्रकाशझोत कॉग्रेसच्या NSUI च्या विद्यार्थी संघटनेतून व कर्नल सुधीर सावंत यांच्या विचारावर प्रभावित होऊन त्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीस सुरुवात केली.तत्कालीन काॅगेसचे खासदार सुधीर सावंत यांचे काम व कार्य महेंद्र सांगलेकर यांनी आपल्या जीवनात बघितले होते.
त्यानंतर आता पर्यंत गेली २०वर्ष ते कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने व कला क्रिडा,सामाजिक काम करत आहेत. गरीब जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाऊन त्यांना मदत करणे हेच ते आपले आद्य कर्तव्य मानतात. आतापर्यंत ५६ वेळा रक्तदान करून त्यांनी अनेक रुग्णांंचे प्राण वाचवले आहेत.तसेच आतापर्यंत १ हजार लोकांमध्ये रक्तदानाची जनजागृती करून त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्याची किमया त्यांनी केली.
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे त्यांना रुग्णालयात दाखल करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून घेणे आणि रक्त पुरवठा करण्यासाठी मदत करणे हीच सामाजिक बांधिलकी जपणारी कामे महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या जीवनात केली. कॉंग्रेस पक्षाचे काम कार्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत नेहमीच आपल्या नेतृत्वाचा दाखला देत.कर्नल सुधीर सावंत, अँड. दिलीप नार्वेकर, तत्कालीन माजी जिल्हाध्यक्ष कै. विजयराव नाईक, तत्कालीन माजी जिल्हाध्यक्ष कै. मा. रमाकांत सावंत, पी. एफ. टान्टस, विलास गावडे, सुनील राऊळ तत्कालीन काँग्रेसचे नेते आणि आताचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक या सर्वांचा आवडता कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कॉंग्रेस पक्षाने केलेल्या अनेक संघर्षात, जनतेसाठी केलेल्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ही आंदोलने करताना त्यांनी पक्षासाठी अनेक पोलिस केसेस स्वतःच्या अंगावर घेतल्यात. मात्र आजही पोलीस व अधिकारी वर्गात महेंद्र सांगेलकर यांच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तेवढेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते २० वर्ष कॉंग्रेस पक्षात आत्मीयतेने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करून जिल्ह्याची जबाबदारी सोपवली.
हि जबबदारी यशस्वीपणे पार पडल्यान सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. आज हि जबबदारी ते चोखपणे पार पाडत असून सावंतवाडी तालुक्यात कॉंग्रेसची मजबूत संघटना बांधण्याचे चे काम अविरतपणे करत आहेत. युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेते मंडळीतही मित्रत्वाच नात निर्माण केल. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला व जगाला कोरोना महामारीच्या हादरून सोडलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे कोरोना संकट गडद होत होते मात्र या परिस्थितीतही या संकटात देखील महेंद्र सांगेलकर गरजूंचा आधार म्हणून उभे राहिले.
त्यांनी सावंतवाडी तालुक्यासह दोडामार्ग, वेंगुर्ला येथे देखील गरजूंना मदितीचा हात दिला. धान्य,गरजू वस्तू बरोबर त्यानी मोफत जेवण गोरगरीब लोकांना वाटत एक मदतीचा हात दिला.तर सर्वसामान्य जनतेसाठी उन्हातानात उभ्या असलेल्या पोलिस बांधवांना,डॉक्टर, नर्स यांना थंड सरबत,मोफत जेवण वाटत त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. एवढच नव्हे तर सामाजिक कार्याचा त्यांचा वसा त्यांच्या पत्नीन देखील अंगीभूत करत लॉकडाउनकाळात भुकेलेल्या मजुरांना स्वत: अन्नपूर्णा बनत त्यांना भुकेचा घास दिला. आजही सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून ते आणि त्यांचे पक्षातील सहकारी सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. 2016 मध्ये गौण खनिज प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौण खनिज या बाबत झालेलं डंपर आंदोलन फार गाजलं या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अनेक जण नेतृत्व करत होते त्या नेतृत्वात महेंद्र सांगेलकरांचा मोठा वाटा होता हे आंदोलन यशस्वी करत ते आपल्या डंपर आंदोलकांच्या युवा उद्योजक यांच्यात ते खंबीरपणे पाठीशी राहिले तालुक्यात कोठेही संघर्ष, वाद,हनामारी होऊ दे त्या घटनेची माहिती समजल्यावर स्वतःच्या जीवाची पर्वा करू न करता महेंद्र सांगेलकर घटनास्थळी दाखल होतात. कोणत्या प्रकारचा तो वाद किंवा संघर्ष असू दे एका क्षणात मिटवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशावेळी त्यांच्या संयमी नेतृत्वाची कस लक्षात येत. संघर्ष करण्याची जशी त्यांच्या मनगटांमध्ये ताकद आहे. हृदयामध्ये
