*⚡देवगड ता.११-:* देवगड आगारात चालक पदावर कार्यरत असलेले चालक विजय पांडुरंग उर्फ दाजी इंदप हे आपल्या २६ वर्षाच्या प्रदीर्घ सुरक्षित सेवेतून सेवामुक्त झाले.त्या निमित्त त्यांचा रापम विभागीय कार्यालय व देवगड आगार यांचे वतीने सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर,सहा. वाह.निरीक्षक लवू सरवदे यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील जीवनास शुभेच्छा व्यक्त केल्या. श्री इंदप ११नोव्हेंबर १९९६ रोजी देवगड आगारात सेवेत रुजु होऊन त्यांनी अधिकाधिक सेवा लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यावर सुरक्षित व सौजन्यपूर्ण पार पाडली.३० एप्रिल रोजी ते सेवा निवृत्त झाले. प्रामुख्याने रापम कर्मचारी संप दुखवटा काळात ते ठराविक कालावधीनंतर सेवेत रुजू होऊन त्यांनी मालवण आगारात रत्नागिरी ,कोल्हापूर या मार्गावर सेवा बजावीत सर्वाधिक उत्पन्न आणण्याचा मान व सन्मान देखील मिळविला.देवगड आगारात मुंबई,बोरिवली बरोबर अन्य लांब पल्याच्या आंतरराज्य पणजी,बेळगाव या मार्गावर सर्वाधिक सुरक्षित व प्रामाणिक, सौजन्यपूर्ण सेवा दिली.तत्पूर्वी त्यांनी खाजगी ट्रक व्यवसायात १० वर्षे सुरक्षित सेवाही पार पाडली होती.
