*⚡देवगड ता.११-:* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नंबर १ या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा १८ मे २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे .
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत ,जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद मुख्य अधिकारी प्रजीत नायर,शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात हे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता मान्यवरांचे स्वागत ,दु.१वाजता महाप्रसाद ,दुपारी ३ वाजता स्थानिक भजने ,सायंकाळी ५ वाजता विविध स्पर्धा ८ वाजता विद्यार्थी गुणगौरव, व सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन अमृतमहोत्सवी कमिटी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
