भाजपचे सिंधुदुर्ग प्रभारी आ प्रसाद लाड सिंधुदुर्गात

आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत होणार चर्चा;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सत्ता आणण्याची दिली हमी

सावंतवाडी ता.०९-:* आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी प्रभारी प्रसाद लाड आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांची यावेळी भेट घेतली आहे. यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्यांवर त्यांच्याशी संजू परब यांनी चर्चा केली असून, कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता मिळवून देणार असल्याचे आश्वासन संजू परब यांनी प्रसाद लाड यांना दिले आहे.

आमदार प्रसाद लाड आज जिल्हा दौऱ्यावर आले असताना बांदा येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. यावेळी बंटी पुरोहित महेश धुरी,बाळू सावंत,अवि पंडित,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page