भजनी बुवा अर्थव दळवी यांचा विशेष पुरस्काराने सन्मान

*⚡बांदा ता.०९-:* सरमळे येथील श्री सातेरी भगवती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आयोजित स्पर्धेत विलवडे येथील बुवा रावजी उर्फ अर्थव सोनु दळवी याला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रावजी यांनी श्री देवी माऊली मुळपुरुष प्रसादिक मंडळ, विलवडे या भजनी बालगोपाळ मंडळीच्या सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे रावजी याने विलवडे येथील गोवर्धन संगित विद्यालयात लहान वयात हरी भजनाचे धडे घेत.

लहान वयात रावजी यांनी या स्पर्धेत वावा मिळविली. र‍ावजी हा विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी यांचा मुलगा असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. परिसरात रावजी यांचे विशेष काैतुक होत आहे. यावेळी बुवा प्रकाश चिले, मृदुंगमणी विशारद दादा परब, अर्जुन गावडे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रावजी यांचा प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह गुलाबपुष्प देऊन गाैरविण्यात आले.

You cannot copy content of this page