वेंगुर्ला ता.०८-:* वायंगणी येथील श्रीदेव डोंब विकास मंडळामार्फत राबविण्यत येत असणारे विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नं.२ येथील शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ज्येष्ठ निवृत्त शिक्षक चंद्रकांत पेडणेकर यांनी केले.
श्री.देव डोंब विकास मंडळामार्फत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण व शाळेच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी भरघोस निधी वितरीत करण्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष दीपक कोचरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपिठावर मंडळाचे उपाध्यक्ष भिसाजी कोचरेकर, खजिनदार नंदकिशोर मसुरकर, सदस्य विष्णू नांदोस्कर, मोहन मसुरकर, गणेश कोचरेकर, बाळकृष्ण रेवणकर, सुभाष कोचरेकर, सुभाष मुणनकर, वामन कोंडुरकर, सेवानिवृत्त शिक्षक संभाजी येरागी, चंद्रकांत पेडणेकर, मुख्याध्यापिका रसिका मांजरेकर, शिक्षक गोंधळ आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत केळजी यांनी प्रास्ताविक व आभारचे काम पाहिले.
