जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होण्यासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठवणार

पक्ष श्रेष्ठींशी बोलून घेणार निर्णय; राजन तेली यांची माहिती*

*💫कणकवली दि.१५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या नोटीस नुसार पूर्वीच्या मतदारांचा ठराव कायम राहतील अशा सूचना केली असून, त्याला आक्षेप असल्याचे मत भाजप तालुकाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे. याबाबत आपण पक्ष श्रेष्ठींशी बोलून याबाबत आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचे पण त्यांनी यावेळी सांगितले आहे. जिल्हा बँकेची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली असून, या काळात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांनी ७० टक्के हुन जास्त ठराव झालेले असताना देखील विविध प्रलोभने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दाखवत आहेत. निवडणूक आयुक्तांना याबाबत तक्रार देत नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. परंतु आज दैनिकात दिलेल्या नोटीस नुसार १८ ते २२ जानेवारी हा फक्त ५ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. यातून राज्य सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. अद्यापही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मतदानाचे अधिकार असलेले ४५७ ठराव येणे अजून बाकी आहे. कोव्हीडमुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम स्थगित झालेल्या प्रक्रियेपासून गृहीत धरण्यात आला आहे. याविरोधात उच्च न्यायालयात भाजपा दाद मागणार आहे अशी माहिती तेली यांनी दिली. कोरोनाच्या आड सत्ताधारी राजकारण करत आहेत. जिल्हा बँक निवडणूक पारदर्शी होणे गरजेचे आहे. त्यामुळे न्यायासाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचेही तेली म्हणाले.

You cannot copy content of this page