सावंतवाडी तालुक्यात ११:३० पर्यंत १७.१० टक्के मतदान

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली असून, मतदारांनी देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केलेली पहायला मिळत आहे. तालुक्यात ११:३० वाजेपर्यंत १७.१० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये कोलगाव १५.६४%, मळगाव १९.६५% , आंबोली १३.७१%, चौकुळ २८.९१%, तळवडे १८.४७%, मळेवाड १८.०९%, दांडेली १७.११%, आरोस १९.१४%, इन्सुली १६.९८%, डिंगणे १४.४५%, आरोंदा ११.८७% एवढे मतदान झाले आहे.

You cannot copy content of this page