सासोली येथील मंदार हॉलमध्ये आयोजन
दोडामार्ग ता.०७-:* कणेरी कोल्हापूर येथील प.पू.स.स.काडसिध्देश्वर महास्वामीजी मठाधिपती कणेरी कोल्हापूर यांचा आध्यात्मिक सत्संग आनंद सोहळा हा दोन वर्षांनंतर दोडामार्ग तालुक्यात सासोली मंदार हाॅल येथे १४ मे रोजी आयोजित केला आहे.तरी दोडामार्ग तालुक्यातील सर्व भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन काडसिध्देश्वर सांप्रदाय मंडळ दोडामार्ग यांच्या वतीने एकनाथ गवस, राकेश धर्णे यांनी केले आहे.
