जिल्हा कबड्डी फेडरेशने जिवंत असताना मयत दाखवून फसवणूक केली

संस्थापक अण्णा केसरकर यांचा आरोप

सावंतवाडी ता.०७-:* मी व माझ्या सहाय्यक सदस्यांनी एकत्र येऊन 1983 मध्ये स्थापन केलेली संस्था आपल्या मर्जीत व मर्जीतील सदस्यांना संस्थेच्या कार्यकारणीत सामील करून घेता यावे या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन अध्यक्ष कार्यवाह व इतरांनी संमतीने आपल्याला जिवंत असताना मयत दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून आपली फसवणूक केली आहे. तर आजीव सभासदत्व रद्द करण्याचा कोणताही अधिकार नसताना आपले बेकायदेशीर नाव रद्द करण्यात आले आहे असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत फेडरेशनचे संस्थापक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केला.

तर या प्रकारात जबाबदार असणाऱ्या कार्यकारणी सदस्यांसह धर्मादाय आयुक्ततांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आपण राज्य फेडरेशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज येथील आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रसाद अरविंदेकर, नंदन वेंगुर्लेकर, जितेंद्र म्हापसेकर, आर. डी. बांदेकर, विकी केरकर, एस. ए. लाखे, हनुमंत कारीवडेकर, नरेंद्र मुळीक आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page