जकातनाका येथील भजन कार्यक्रमाचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…

सावंतवाडी — मळेवाड जकातनाका येथे सास्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भजनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम संस्कृतिक महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात निमंत्रित भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे संतोष जोईल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना मळेवाड गावाशी आपले भावनिक नाते असून हा गाव हा माझा गाव आहे असे सांगत या गावाच्या विकासासाठी जी काही मला मदत करायची आहे ती मी नक्की करेन असे आश्वासन दिले.

तसेच गावागावात अशा प्रकारचे महोत्सव होणे गरजेचे असून यामुळे स्थानिकांना हक्काचे व्यासपीठ मिळते असे मत व्यक्त केले. यावेळी ग्रा प सदस्य तात्या मुळीक, महेश शिरसाट, श्री. पाडगावकर, संजय मोरजकर, विजय मुळीक, गुरू मुळीक, परशुराम मुळीक, आल्हाद नाईक, आपा काळोजी, काका सावळ,राहुल नाईक आदि उपस्थित होते. फोटो ओळ — कार्यक्रमाचा शुभारंभ करताना पुंडलिक दळवी व इतर मान्यवर.

You cannot copy content of this page