पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन मालवण वासीयांनी एकजूट दाखवावी – महेश कांदळगावकर

मालवण ता.०७-:* मालवण नगरपालिकेतील आमचा कालावधी संपला असला तरी आमच्या कार्यकाळात मालवणात पर्यटन महोत्सव आयोजित करावा असा आमचा मानस होता. त्यासाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्षात असा महोत्सव घेता आला नाही. सध्या नागरपालिकेवर प्रशासक असला तरीही आम. वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून नगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन च्या माध्यमातून दि. १३ ते १५ मे दरम्यान मालवणात पर्यटन महोत्सव होत आहे.

या महोत्सवात मालवणच्या नागरिकांनी सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करतानाच मालवणातील पर्यटन वाढीबाबत आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. मालवण मध्ये दांडी बीच येथे १३, १४, १५ मे रोजी पर्यटन महोत्सव मालवण नगर परिषदे तर्फे आयोजित केला आहे. मालवण हे पर्यटन दृष्ट्या विकसित होणारे शहर आहे आणि दरवर्षी पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अश्या प्रकारचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मुख्य उद्देश आहे. जेणे करून पर्यटन वृद्धी बरोबर मालवण मध्ये व्यवसाय वृद्धी देखील होणारी आहे. त्याच प्रमाणे मालवण वासीयांना सुद्धा करमणुकीचे साधन उपलब्ध करून देणे हा त्या मागचा उद्देश आहे.

या पर्यटन महोत्सवा निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत त्यात नागरिकांनी सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कराव्यात तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यावा. या पर्यटन महोत्सवा निमित्त दि. १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर ते नगरपालिका अशी शोभा यात्रा आयोजित केली आहे. तरी सर्व मालवण वासीयांनि यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महेश कांदळगावकर यांनी केले आहे. तसेच दांडी येथे हा पर्यटन महोत्सव आयोजित केल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी या पर्यटन महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानत आहोत, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page