दहा ते बारा बागा भक्ष्यस्थानी;लाखो रुपयांचे नुकसान
दोडामार्ग ता.०७-:* येथून जवळ असलेल्या कोलझर गावातील दहा ते बारा काजू बागायदार यांच्या काजू बागायती मध्ये भर दुपारी कडाक्याच्या उन्हात लागलेल्या आगीच्या वणव्यात वीस एकर पेक्षा जास्त जमीनीतील काजू बागायती मध्ये पसरलेल्या या आगीत हजारो काजू झाडे जळून होरपळून लाखो रूपये नुकसान झाले आहे. कृषी विभाग कर्मचारी महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.भर दुपारची वेळ कडक ऊन त्यामुळे आगीवर नियंञण मिळवणे शक्य झाले नाही
