शाहू महाराज यांना आदरांजली

वेंगुर्ला ता.०७-:* लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १००व्या पुण्यतिथी निमित्ताने वेंगुर्ला येथील होमिओपॅथीक कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागाच्यावतीने १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी डॉ. संज्ञा लिंगवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ.के.जी.केळकर, विभाग प्रमुख डॉ.संजीव लिंगवत, डॉ.सतिश पाटील, डॉ.श्रीराम हिर्लेकर, डॉ. रुपाली माळी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page