साटेली भेडशी माजी ग्रा.पं.सदस्य महेश धर्णे याचे निधन

दोडामार्ग ता.०७-:* साटेली भेडशी गावातील युवा कार्यकर्ता माजी ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश गुरूदास धर्णे वय वर्षे ४२ याचे शनिवारी सकाळी साटेली भेडशी आरोग्य केंद्रात हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्याच्या या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महेश धर्णे याची प्रकृती अचानक खालावली धाप लागू लागली त्यामुळे त्याला शनिवारी सकाळी उपचारासाठी साटेली भेडशी आरोग्य केंद्रात आणले असता उपचार दरम्यान निधन झाले.या नंतर दोडामार्ग पोलिस स्थानकात माहिती दिली.पोलिसांनी आरोग्य केंद्रात येऊन सोपास्कर पूर्ण केले डाॅ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन केले नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

You cannot copy content of this page