वेंगुर्ला ता.०७-:* प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य परिवहनच्या वेंगुर्ला आगाराची बस सेवा ज्या ठिकाणापर्यंत सुरु आहे, त्या ठिकाणापर्यंत पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे.
पार्सल सेवेचा दर ३० किलो प्रति नग १२० रुपये अधिक ३० रुपये जीएसटी मिळून एकूण १५० रुपये एवढा राहील. तरी प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुख एन.डी.वारंग यांनी केले आहे. पार्सल सेवेसाठी खोबरेकर (९११२६३४८०४) यांच्याशी संफ साधावा.
तसेच वेंगुर्ला आगारातून मालवाहतूक सेवा पुरविण्यात येणार आहे. सरासरी २०० कि.मी.पर्यंत प्रति किलोमिटर ७५ रुपये एवढा राहील. २०० किलोमिटरच्या पुढील मालवाहतूकीसाठी प्रति किलोमिटर ५५ रुपये एवढे भाडे आकारण्यात येईल.
