पुणे येथील हरीहर नातू बुवा यांचे किर्तन
बांदा ता.३०-:* डेगवे-आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात अक्षय तृतीया दिवशी अर्थात मंगळवारी 3 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापुजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे. या स्थळात डेगवे-आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन, श्री सत्यनारायणाची महापुजा, श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे, त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता, श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे, शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात. ही पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे.
अलीकडेच सदर परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे. त्यामुळे अक्षय तृतीया या दिवशीचे महत्त्व जाणून श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे सकाळी 10 वाजता आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी तीर्थप्रसादाचा व दुपारी महाप्रसादाचा, लाभ घ्यावा.
तसेच रात्री 8 वाजता पुणे येथील ख्यातनाम किर्तनकार हरीहर नातू बुवा यांचे धार्मिक कार्यक्रमावर आधारित किर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियमची साथ स्वप्नील गोरे व तबलावादक गणेश वेतोरकर यांची साथ लाभली आहे. शिवाय स्थानिक ग्रामस्थाच्या भजन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा राज्यस्तरीय ग्रंथमित्र उल्हास देसाई व डेगवे गावचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.
