पाडलोस सोसायटी चेअरमनपदी तुकाराम शेटकर

तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ नाईक बिनविरोध

*⚡बांदा ता.३०-:* पाडलोस विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम नवसाजी शेटकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ अंकुश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री देव रवळनाथ माऊली सहकार आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक पार पडली.

दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी संचालक लक्ष्मण गावडे, राघोबा गावडे, अर्जुन कुबल, आनंद कुबल, सूर्यकांत नाईक, गोविंद पराडकर, गटसचिव सुभाष राऊळ तसेच शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, मळेवाड युवासेना विभाग प्रमुख समीर नाईक, शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रामस्थ विठू गावडे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. आर. माळगावकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page