निषेध आंदोलन करून विद्यार्थ्यांना रोखणाऱ्या शिवसैनिकांना घेण्यात आले ताब्यात
*⚡सावंतवाडी ता.३०-:* सिंधुदुर्गात सांगेली येथे असणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी काही पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील शाळांमध्ये नाममात्र प्रवेश दिला जात असून,. त्याद्वारे ते नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधात आज नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा केंद्राबाहेर शिवसेनेने निषेध आंदोलन केले असून, परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच रोखून धरले होते. त्या विद्यार्थ्यांस परीक्षा देऊ देणार नाही, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली होती. यावेळी पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत. परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यावेळी पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे पालक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला होता. परंतु, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे.
यावेळी निषेध आंदोलन करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, शुभांगी सुकी, अपर्णा कोठावळे, अशोक दळवी, मायकल डिसोजा, गुणाजी गावडे, योगेश नाईक, सागर नानोस्कर, विशाल सावंत, विनायक सावंत, बंड्या घोगळे, प्रशांत कोठावळे, प्रतिक बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
